esakal | लस घ्यायला जाणंही होतं आर्थिक अडचणीचं; वेल्ह्यात स्वखर्चातून उपलब्ध केली बस

बोलून बातमी शोधा

velhe corona Pune

वेल्हे तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना लस घ्यायला जाण्यासाठी देखील आर्थिक अडचणी येत होत्या.

लस घ्यायला जाणंही होतं आर्थिक अडचणीचं; वेल्ह्यात स्वखर्चातून उपलब्ध केली बस
sakal_logo
By
मनोज कुंभार-वेल्हे

वेल्हे (पुणे) : राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीचे मोफत लसीकरण करण्यात येत आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. मात्र वेल्हे तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना लस घ्यायला जाण्यासाठी देखील आर्थिक अडचणी येत होत्या. मात्र, जिल्हा परिषद सदस्यांनी मोफत बस उपलब्ध करून दिली आहे. या ज्येष्ठांसाठी हे जिल्हा परिषद सदस्य देवमाणूस बनल्याच्या भावना ज्येष्ठ नागरिकांच्या व्यक्त केल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र पानशेत या ठिकाणी लसीकरण सुरू आहे. या केंद्रावर येण्यासाठी पानशेत परिसरातील बावीस गावांमधून ज्येष्ठ नागरिक येत आहेत. परंतु आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने काही जेष्ठ नागरिक लसीकरणाच्या केंद्रावर येत नाहीत. हे समजल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी येथील २२ गावांमधील ज्येष्ठ नागरिक यांना केंद्रापर्यंत येण्या-जाण्यासाठी मोफत एसटी बसची सोय केलेली आहे.  त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे ज्येष्ठ नागरिकांसाठी देव माणूस बनले आहेत. पानशेत परिसरातील अनेक गावे दुर्गम आणि डोंगराळ भागात आहेत घोल, दापसरे, खानू, चांदर, कुरवटी माणगाव, शिरकोली, कशेडी आधीच २२ गावातून या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक येत आहेत.

हेही वाचा - पुण्यात न्यायाधीशानेच घेतली 50 हजारांची लाच; जामीनावर झाली सुटका

घोल, दापसरे,खानू, चांदर हा परिसर अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भाग आहे. परिसरात ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात असून आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने लसीकरणासाठी येण्या-जाण्यासाठी पैसे नाहीत अशी काही लोक आहेत ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी एसटीच्या तिकिटाचे पैसे भरण्याची तयारी दर्शवली. येथील ज्येष्ठ नागरिकांची ने-आण करण्यासाठी एसटी मोफत देण्याचे ठरवले आत्तापर्यंत पानशेत लसीकरण केंद्रावर २१४४ जणांनी लस घेतली आहे.  पानशेत लसीकरण केंद्रावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयश्री कुमावत, आरोग्यसेविका निर्मला गायकवाड, रोषणा कांबळे, यमुना फिरंगवाढ, कल्पना निमजे, आरोग्य सेवक राजेश परदेशी,शिवानंद जठार, सूनिकेत रायकर काम करीत आहेत.