वेल्हे, (पुणे) - छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका करण्यात आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत आज गुरुवारी (ता. २१) रोजी वेल्हे बुद्रुक (ता. राजगड) येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक रिवाजात स्वागत करण्यात आले. हर हर महादेव, जय शिवरायच्या जयघोषाने, हलगी, तुरारीच्या निनादाने राजगड तोरण्याची दरी खोरी दुमदुमून गेली होती.