
Velhe Accident
Sakal
वेल्हे : वेल्हे चेलाडी रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांमुळे नागरीकांचा बळी जाऊ लागला आहे. या रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या भारती बाळू दसवडकर या महिलेचा मृत्यू झाला आहे. गेल्या अडीच महिन्यातील हा दुसरा बळी असून या निमित्ताने वेल्हे चेलाडी या रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्न एरणीवर आला असून नागरीकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी नागरीकांची संतप्त भावना असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.