esakal | Video : पुण्यात व्हेंटिलेटरचा तुटवडा; 20 जणांची मृत्यूशी झुंज
sakal

बोलून बातमी शोधा

Ventilator

यांना हवेत व्हेंटिलेटर
कोरोनामुळे फुस्फुसावर परिणाम झालेल्या, ऑक्‍सिजनचा पुरवठा करूनही धाप कमी न झालेल्या रुग्णांना ‘व्हेंटिलेटर’ची गरज भासत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. याआधी साधारपणे ५५ पेक्षा अधिक वयाच्या रुग्णांना ही गरज असायची आहे. मात्र, आता अगदी ३२ वर्षांच्या रुग्णांनाही ‘व्हेंटिलेटर’ वापरावे लागत असल्याचे डॉ. श्रीरंग लिमये यांनी सांगितले. कोरोनाव्यक्तिरिक्त हदयरोग, मेंदूच्या आजारासह अन्य आजाराच्या रुग्णांना व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेड पुरवावे लागत आहेत.

Video : पुण्यात व्हेंटिलेटरचा तुटवडा; 20 जणांची मृत्यूशी झुंज

sakal_logo
By
ज्ञानेश सावंत

पुणे - पुण्यात कोरोनाचे भीषण परिणाम जाणवू लागले असून, अत्यवस्थ स्थितीतील २० रुग्णांना ‘व्हेंटिलेटर’ मिळत नसल्याने त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. मात्र, तरीही शुक्रवारी दिवसभरात एकाही हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी ‘आयसीयू बेड’ ही उपलब्ध होऊ शकले नाही. ही स्थिती आणखी गंभीर होण्याच्या शक्‍यतेने महापालिकेने खासगी हॉस्पिटल पिंजून काढण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेड सापडले नसल्याने हे रुग्ण ऑक्‍सिजनवर तग धरून आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे वीसही रुग्ण ४० ते ६० आणि ७० ते ७५ वयोगटातील असून, त्यांच्यावर छोटे खासगी हॉस्पिटल आणि घरांत उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. पुण्यात कोरोनाने ओढवलेली स्थिती खरोखरच हाताबाहेर गेली असून, आता रोज सरासरी दोन हजाराच्या घरात नवे रुग्ण सापडत आहेत. त्यात अन्य आजारांच्या विशेषत: अस्थमा, मधुमेहाच्या किमान ६० ते ६५ जणांना ‘व्हेंटिलेटर’ आणि ‘आयसीयू बेड’ची गरज भासत असल्याचे महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे सांगत आहेत.

पुण्यात दिवसभरातील स्थिती

  • १, ७०५ - नवे रुग्ण
  • ७७३ - बरे झालेले
  • ११ - मृत्यू
  • ५२७ - अत्यवस्थ रुग्ण
  • ६८११ - तपासणी

खासगी हॉस्पिटलमधील एकूण  बेडपैकी ५० टक्के जागा कोरोना रूग्णांसाठी ताब्यात घेत आहोत. त्यामुळे पुरेसे व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेड मिळतील. त्याशिवाय, नव्याने 14 हॉस्पिटलशी चर्चा सुरू असून, त्यांच्याकडूनही आयसीयू बेड' उपलब्ध करीत आहोत. सध्या २० रूग्णांना आॅकिसजन उपलब्ध करून दिले आहे. ‘’
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका

Edited By - Prashant Patil