
पुणे, ता. २३ : ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि ‘दूरदर्शन’वरील प्रसिध्द वृत्तनिवेदक प्रा. अनंत भावे (वय ८८) यांचे रविवारी (ता. २३) पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. प्रा. भावे यांना बालसाहित्यामधील योगदानाबद्दल २०१३ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. पुण्यात ते बाणेर परिसरात वास्तव्यास होते. चार वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी पुष्पा भावे यांचं निधन झालं होतं.