Pune : ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार अनंत खरे यांचे निधन | Anant Khare | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Veteran marathi writer novelist Anant Khare passed away in pune

Pune : ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार अनंत खरे यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ लेखक आणि कादंबरीकार अनंत खरे यांचे पुण्यात दीर्घ आजारानंतर निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. साहित्य विश्वात खरे यांचं वेगळ स्थान आहे. अनंत खरे यांना त्यांच्या नंदा खरे या नावाने देखील ओळखले जाते. ते त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनासाठी ओळखले जातात. त्यांच्या अनेक कादंबऱ्या मराठी साहित्य विश्वात गाजल्या आहेत. ज्यापैकी ‘अंताजीची बखर’, ‘बखर अंतकाळाची’ आणि ‘उद्या’ ह्या त्यांच्या कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. (Veteran marathi writer novelist Anant Khare passed away in pune)

२०२० साली त्यांना साहित्य आकदमीसाठी त्यांत्या 'उद्या' या कादंबरीसाठी साहित्य आकादमीचा पुरस्कार जाहीर झाला होता, मात्र त्यांनी हा पुरस्कार नाकारला होता. त्यासाठी त्यांनी मला समाजाने बरंच काही दिलं आहे त्यामुळे आता पुढे पुरस्कार स्विकारण्याची इच्छा नाही असे ते म्हणाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांची 'नांगरल्याविण भुई' ही कादंबरी प्रकाशीत झाली आहे. मुंबईच्या आयआयटीमधून त्यांनी अभियांत्रिकेचे शिक्षण देखील घेतले आणि अभियंता म्हणून काही काळ काम देखील केले.

टॅग्स :Pune News