

From Border to Farm: Veteran Soldier’s Struggle for Land Rights
Sakal
मंचर : देशसेवेसाठी तब्बल १७ वर्षे लष्करामध्ये कार्यरत राहून जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात सेवा बजावली. मात्र आता स्वतःच्या वडिलोपार्जित शेतजमिनीच्या प्रश्नासाठी न्याय मागण्याची वेळ आली असल्याची खंत माजी सैनिक भरत तुकाराम विश्वासराव यांनी व्यक्त केली आहे. वाळूंजवाडी (ता. आंबेगाव) येथील शेतजमिनीत विनापरवाना उभारण्यात आलेले वीज खांब व रस्त्याच्या कामामुळे शेतीच्या वापरावर गंभीर परिणाम होणार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.