
गोखले इंस्टिट्यूटच्या कुलगुरू पदी डॉ. अजित रानडे
पुणे : गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या (अभिमत विद्यापीठ) कुलगुरू पदी अर्थतज्ज्ञ डॉ.अजित रानडे (Dr. Ajit Ranade) यांची निवड करण्यात आली आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि संस्थेचे कुलपती डॉ.राजीव कुमार यांनी आदित्य बिर्ला ग्रुपचे मुख्य आर्थिक सल्लागार असलेले डॉ. रानडे यांची नियुक्ती केली आहे. (Gokhale Institute)
कुलसचिव पी.एन.नाथ यांनी यासंबंधी परिपत्रकाद्वारे माहिती दिली. फेब्रुवारी महिन्याच्या ४ तारखेला डॉ. रानडे यांनी पदभार स्वीकारणे अपेक्षित आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी) येथे विजतंत्री अभियंता म्हणून पदवीचे शिक्षण घेणारे डॉ. रानडे यांनी अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठात पीएच.डी. पूर्ण केली आहे. तसेच अहमदाबाद येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेचे ते माजी विद्यार्थी आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ रिसर्च येथे अध्यापनाचा त्यांना दीर्घ अनुभव आहे.
Web Title: Vice Chancellor Ranade Institute Ajit Ranade
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..