

विचारांच्या लढाईत आघाड्यांचा विजय
पृथ्वीराज चव्हाण; पदवीधर, शिक्षकसाठी प्रचार मेळावा
ओगलेवाडी, ता. १५ ः मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार राजीनामा देत नाहीत व निवडणूक प्रणालीत आमूलाग्र बदल होत नाही, तोपर्यंत मागण्यांसंबंधी तरुण थांबणार नाहीत. विचारांच्या लढाईत आघाड्यांचा सत्याचा विजय होणार असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. हर्षदा
देशमुख-जाधव, जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ कऱ्हाड उत्तर व दक्षिण मतदारसंघातील मतदार व पदाधिकाऱ्यांचा मेळावा सैदापूर (ता. कऱ्हाड) येथील गजानन सोसायटीत झाला. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, सारंग पाटील, उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, अजित पाटील, देवराज पाटील, प्रशांत यादव, अनुराधा देशमुख उपस्थित होते.
शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सत्तेसाठी नाही, तर शिक्षणाचा बाजार थांबवणारी आहे. तरुणांच्या हातांना काम नाही. अन्यायाला वाचा फोडणारी व सत्याला न्याय देणारी निवडणूक आहे.’’
बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘‘शासनाच्या कारभार व धोरणाबद्दल लोकांची नाराजी व
संतापाची भावना आहे. महाआघाडीच्या उमेदवार डॉ. हर्षदा देशमुख व जयंत आसगावकर यांना पहिल्या पसंतीचे मतदान करा. त्यांची भूमिका कार्यकर्त्यांनी गावोगावी पोहोचवावी.’’
सारंग पाटील म्हणाले, ‘‘महाआघाडीचे उमेदवार शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील समस्या मांडणारे व तळमळीने काम करणारे आहेत.’’
नामदेव पाटील, अजित पाटील, सादिक बागवान, वैशाली जाधव, ॲड. विजय पाटील, हर्षदा मोहिते, माई साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास जयंत पाटील, नंदकुमार बटाणे, रूपाली यादव, अर्चना मोहिते, दीपक लिमकर, सूर्यभान माने, प्रदीप जाधव, मानसिंगराव जगदाळे, सचिन पाटील, ॲड. विद्याराणी साळुंखे, सुप्रिया खराडे आदी उपस्थित होते. बाबूराव पवार यांनी स्वागत केले. प्रशांत यादव यांनी प्रास्ताविक केले. समीर मोहिते यांनी आभार मानले.
सैदापूर ः मेळाव्यात बोलताना पृथ्वीराज चव्हाण. त्या वेळी अनुराधा देशमुख, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, नामदेव पाटील, पोपटराव साळुंखे, सारंग पाटील आदी.
...............................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.