

Maharashtra political leader last rites update
esakal
Ajit Dada Last Rites Ritual : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य ४ जणांचा बारामती येथील विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. बारामती येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर काल (दि. २९) अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दरम्यान, आज दोन्ही मुलांकडून अस्थी विसर्जन विधी पार पडला.