

Maharashtra Emotional Funeral News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुरक्षा अधिकारी (पीएसओ) विदिप दिलीप जाधव यांचा बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेत विमानातील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. विदिप जाधव हे अजित पवार यांच्यासोबत सावली सारखे सोबत असायचे त्यांच्या निधनानंतर काल रात्री सातार्यातील त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या लहान मुलाने पित्याच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला, हा क्षण उपस्थितांचे डोळे पाणावणारा ठरला.