Vidhan Sabha 2019 : समाज भाजपच्या पाठिशी पुन्हा उभा राहील : सुनील कांबळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

कॅन्टोन्मेंट : सामाजिक न्यायाचा विचार कृतीत आणण्याची क्षमता आणि राजकीय इच्छाशक्ती फक्त भारकीय जनता पक्षाच्या नेतृत्वात आहे, याची खात्री सामाजिकदृष्ट्या दुर्बल समाजाची झालेली आहे, त्यामुळेच हा समाज भाजपाच्या मागे या निवडणुकीच्या वेळी उभा राहील आणि कॅन्टोन्मेंटमधून मी प्रचंड बहुमताने विजयी होईल, असा विश्वास सुनील कांबळे यांनी व्यक्त केला.

भाजपचे कॅन्टोन्मेंटमधील अधिकृत उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचारास प्रारंभ झाला असून, प्रचारादरम्यान त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. माझे मोठे बंधू दिलीप कांबळे यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे अन्य कोणताही पक्ष निवडणुकीत टक्कर देऊ शकणार नाही, हा माझा विश्वास आहे. माझ्या नगरसेवकपदाच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत मी सातत्याने जनतेशी संपर्कात होतो आणि आहे. पक्षसंघटनेत सामान्य कार्यकर्त्यापासून माझा प्रवास सुरू झाला. या दोन्हीमुळे मतदार आणि पक्षसंघटना माझ्या पाठिशी भक्कमपणे उभी राहतील. या बाबतीत माझ्या मनात शंका नाही, असे कांबळे म्हणाले.

सुनील कांबळे यांच्या पुढील संपूर्ण आठवड्याच्या प्रचाराचे नियोजन पूर्ण झाले असून पदयात्रा, मोटरसायकल रॅली, नामवंतांच्या गाठीभेटी याचा या नियोजनात समावेश आहे. पक्षाची संपूर्ण बूथरचना प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. कॅन्टोन्मेंट हा वैविध्यपूर्ण मतदारसंघ असून, मतदारांपर्यंत पोचण्यासाठी विविध गट स्थापन करण्यात आलेले आहेत. प्रचारात कोणतिही उणीव राहू नये, यादृष्टीने नियोजन केलेले असून, पुढच्या दोन दिवसात प्रचार पूर्ण ताकदीनिशी सुरू झालेला असेल, असेही येथील प्रमुख कार्यकत्यांकडून सांगण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 bjp leader sunil kamble rally in pune cantonment area