Vidhan Sabha 2019 : शिवसेनेत गोंधळाचे वातावरण

shivsena
shivsena

विधानसभा 2019
पुणे -  विधानसभेसाठी भाजप- शिवसेनेला किती जागा सोडणार, हा प्रश्‍न शिवसेनेमध्ये उत्सुकतेचा झाला आहे. आठपैकी तीन जागा मिळाव्यात, अशी मागणी शिवसेनेचे नेते करत आहेत. सद्यःस्थिती पाहता एकही जागा मिळणार नाही, असे पक्षाच्या एका गटाकडून सांगितले जात आहे. युतीतील वाटाघाटी, पक्षांतर्गत मतभेद व अनपेक्षीत संघटन बदलांमुळे शहर शिवसेनेमध्ये तारतम्य नसल्याने एकुणच पक्षात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. 

 विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत कसबा, कोथरूड, शिवाजीनगर, पर्वती, कॅंटोन्मेंट, वडगाव शेरी, खडकवासला आणि हडपसर या आठही मतदारसंघांत भाजपने १०० टक्के यश मिळविले. महापालिका निवडणुकीतही शिवसेनेचे नुकसान झाले. शिवाजीनगर, खडकवासला मतदारसंघात एकही नगरसेवक नाही. कोथरूड, पर्वती, कसबा, कॅंटोन्मेंटमध्ये प्रत्येकी एक, हडपसर, वडगाव शेरी येथे प्रत्येकी तीन असे १० नगरसेवक आहेत. 

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत; परंतु युतीतील जागा वाटपाबाबत कोणतीही चर्चा नाही. त्यामुळे पक्षातील इच्छुक आपल्या हाताला काय लागणार, या विचाराने द्विधा मनस्थितीत आहेत. काही जण आम्ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहोत, पक्ष आदेश आला पाहिजे या भूमिकेत आहेत. 

भाजपसाठी सर्वांत सुरक्षित असलेल्या कोथरूडमधून शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, पृथ्वीराज सुतार, श्‍याम देशपांडे इच्छुक आहेत. हडपसरमधून माजी आमदार महादेव बाबर यांचा दावा आहेच. शिवाजीनगरमधून माजी आमदार विनायक निम्हण, वडगाव शेरीतून नगरसेवक संजय भोसले, रघुनाथ कुचिक यांचे नाव आहे. खडवासल्यातून रमेश कोंडे, पर्वतीतून बाळा ओसवाल, कॅंटोन्मेंटमधून पल्लवी जावळे, तर कसब्यातून विशाल धनवडे हे इच्छुक आहेत. 

धोक्‍याच्या जागा शिवसेनेला 
भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेमध्ये शिवाजीनगर, वडगाव शेरी, कॅंटोन्मेंट येथील जागा धोक्‍यात आहेत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे हे धोक्‍याचे मतदारसंघ आम्हाला मिळतील, असा दावा शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com