घरांच्या हस्तांतराचा प्रश्न 3 महिन्यांत मार्गी लावणार : अश्विनी कदम यांचे आश्वासन

Vidhan Sabha 2019 congress candidate ashwini kadam rally Pune parvati constituency
Vidhan Sabha 2019 congress candidate ashwini kadam rally Pune parvati constituency

सहकारनगर :  इंदिरानगर, अप्पर सुपर, संभाजीनगर, चव्हाण नगर या भागात जनता वसाहत भागातील घरांचे  पुनर्वसन झाले होते. त्यांना पुणे महापालिकेचने ९९ वर्षे भाडेकराराने सदर घरे दिली आहेत. या घरांच्या  हस्तांतर व मालकी हक्काचा प्रश्न निवडून आल्यावर तीन महिन्यांत मार्गी लावणार, अशी ग्वाही संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांनी दिली. पर्वती विधानसभा मतदार संघाच्या प्रचार फेरीत नागरिकांशी सवांद करताना विश्वास दिला.

या वेळी अप्पर, सुपर, इंदिरानगर परिसरातील वीर बाजी पासलकर कमान, अप्पर चौक, अप्पर परिसर, संभाजी नगर, चव्हाण नगर, सुपर परिसर, शेळके वस्ती, अण्णा भाऊ साठे नगर, पवन नगर परिसर, खडक वस्ती, आईमाता मंदिर, पापळ वस्ती, महेश सोसायटी या परिसरात प्रचार फेरीमध्ये मतदारांशी संवाद साधला. या वेळी सचिन तावरे, शशिकला कुंभार, विजय मोहिते, सिंधुताई बसवंत, गणेश मोहिते, रमेश सोनकांबळे, नितीन कदम, सौरभ माने, मच्छिंद्र बनसोडे, जयराज ठोंबरे उपस्थित होते. प्रचार फेरीत घरोघरी महिलांनी औक्षण करून उमेदवार अश्विनी कदम यांचे स्वागत केले. प्रचार दौऱ्यात महीलांची उपस्थिती लक्षणीय होती. त्याचप्रमाणे युवक-युवतींसह नागरिक यांच्यासह महाआघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अश्विनी कदम म्हणाल्या, ‘ज्येष्ठ नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि सर्व धर्मीय समाज घटकांची सोबत घेऊन पर्वतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. नागरिकांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि स्वतःहून नागरिकांचा मिळत असलेला पाठिंबा यामुळे परिवर्तन होणार असल्याने आघाडीचा विजय निश्चितच आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com