Vidhan Sabha 2019 : माधुरी मिसाळ यांना धक्काही लागू देणार नाही; पंकजा मुंडे यांनी दिला शब्द

टीम ई-सकाळ
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

पुणे : माधुरी मिसाळ आता शहराध्यक्षा आहात. मी पक्षाच्या कोअर कमिटीमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करण्याचे कारण नाही मिसाळ यांना थोडाही धक्का लागू देणार नाही, अशा शब्दांत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मिसाळ यांच्या मागे आपण ठामपणे उभे असल्याचे सांगितले. ‘यापेक्षाही मोठी जबादारी त्यांना मिळो,’ अशा शुभेच्छाही त्यांनी या वेळी दिल्या.

पुण्यावाल्यांनी आमच्यामध्ये भांडणे लावून दिली आहेत आणि ते इकडून बघत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा चार-चार दिवस बीडमध्ये तळ ठोकून आहेत. परंतु, बारामती व इंदापूर वगळता इतर सर्व ठिकाणी युतीचे वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांची धास्ती घेण्याची गरज नाही. शहरासह जिल्ह्यातून राष्ट्रवादीला गुंडाळण्याची वेळ आली, अशी टिकाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर केली. पर्वती विधानसभा मतदार संघातील युतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत मुंडे बोलत होत्या. या वेळी युतीचे नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी या वेळी भाजपत प्रवेश केला.

भाजप हा जातीयवादी पक्ष म्हणून अल्पसंख्याक, दलीतांच्या विरोधी असल्याची टिका राष्ट्रवादीकडून केली जात आहे. परंतु, ‘सबका साथ सबका विकास’ हेच ध्येय भाजप सरकारचे आहे, असे सांगू मुंडे म्हणाल्या, ‘राज्यात भाजपचे सरकार येण्यापूर्वी राष्ट्रवादीची सत्ता होती, त्यांनी पुण्याला काय दिल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्पाना चालना देण्यासाठी पुढाकार घेतला. त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्यांना याचे नियोजन असावे असे कधी वाटले नाही.’ मी मागील वेळी पुण्यात आले तेव्हा माधुरी मिसाळ ह्या शहराच्या अध्यक्षा नव्हत्या. आता शहराध्यक्षा आहात. यापेक्षाही मोठी जबादारी मिळावी अशी अपेक्षा आहे. मी राज्याच्या कोअर कमिटीमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करण्याचे कारण नाही माधुरी मिसाळ यांना थोडाही धक्का लागू देणार नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 minister pankaja munde statement about madhuri misal pune