esakal | #Vidhansabha2019 : अधिकाऱ्यांनाही लागले निवडणुकीचे वेध
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhansabha-2019

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह आता अधिकाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. नुकत्याच निवृत्त झालेल्या एका पोलिस अधिकाऱ्याचे नाव चर्चेत असताना शासकीय सेवेत असलेले एक अधिकारी पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

#Vidhansabha2019 : अधिकाऱ्यांनाही लागले निवडणुकीचे वेध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह आता अधिकाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. नुकत्याच निवृत्त झालेल्या एका पोलिस अधिकाऱ्याचे नाव चर्चेत असताना शासकीय सेवेत असलेले एक अधिकारी पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तशी राजकीय पक्षांच्या नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे.  त्यातच आता शासकीय सेवेत असलेले आणि निवृत्त अधिकारीही आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे शहरातील राजकारणात रंग भरू लागला आहे. पोलिस दलातून नुकतेच निवृत्त झालेले भानुप्रताप बर्गे यांची राजकीय इच्छा लपून राहिलेली नाही. शहरभर फ्लेक्‍स लावल्यानंतर आता थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरावे की नाही, यावरून मतचाचणी घेण्यास सुरवात केली आहे. ते शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. 

आता आणखी एका अधिकाऱ्यांचे नाव पुढे आले आहे. हे अधिकारी सध्या शासकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांना देखील भाजपकडून पुणे कॅंटोन्मेंटमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा सुरू आहे. त्यासाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्तीही घेण्याची तयारी दर्शविली आहे. एवढेच नव्हे, तर तसा अर्ज देखील सरकारकडे केल्याचे बोलले जात आहे. सध्या या मतदारसंघाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे करीत आहे. 

दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे मंत्रिपद गेले आहे. परंतु ते पुन्हा इच्छुक आहेत. पक्ष त्यांना की नव्या चेहऱ्याला संधी देणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

loading image
go to top