Vidhan Sabha 2019 : पर्वती मतदारसंघात अश्विनी कदम यांना वाढता पाठिंबा 

vidhan sabha 2019 pune parvati constituency ashwini kadam getting community support
vidhan sabha 2019 pune parvati constituency ashwini kadam getting community support

सहकारनगर : पर्वती विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कष्टकरी पथारी व्यवसाय पंचायत, हमाल पंचायत आणि श्री छत्रपती शिवाजी कामगार युनियन मार्केट यार्ड, मुस्लिम समाज, मातंग एकता आंदोलन यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे कदम यांना समाजातील सर्व घटकांमधून वाढता पाठिंबा मिळत असल्यामुळे पर्वतीमध्ये परिवर्तनाची लाट आली आहे.

पर्वती विधानसभा मतदारसंघात आघाडीने अश्विनी नितीन कदम यांना उमेदवारी दिली आहे. अश्विनी कदम या शिक्षिका आहे. स्वच्छ प्रतिमा असणार्‍या कदम यांनी तीन वेळा नगरसेविका म्हणून काम पाहिले आहे. त्यांना स्थायी समिती अध्यक्षपदाचा अनुभव आहे. नगरसेविका अश्विनी कदम यांनी केलेल्या विकास कामामुळे त्यांचे सर्व ठिकाणी स्वागत केले जात आहे. नागरिक अश्विनी ताई आम्ही तुमच्या बरोबर आहोत असा विश्वास देत आहेत. त्यामुळे पर्वती मतदारसंघात महाआघाडीला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. सहकारनगर भागातील पोटे दवाखान्यामध्ये एमआरआय सुविधा अल्प दरात दिली आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदत ठरणारया कॅनालकडेने रस्ता करण्याचा निर्णय स्थायी समिती अध्यक्ष असताना त्यांनी घेतला आहे.

वाळवेकर उघानासह प्रभागातील अन्य उघानांना नवसंजिवनी देण्याचे काम केले. उद्यानात नागरिकांसाठी ओपन जिम सुरु केली. पद्मावती येथे स्वामी विवेकानंद यांचे शिल्प तसेच पर्वती येथे पेशवाईच्या इतिहासावर पेशवाई सृष्टी बनविण्याचे काम सुरु आहे. कदम यांनी प्रभागात कामाचा झंझावात निर्माण केला असुन नागरिकांचे काम, प्रश्न सोडविण्यासाठी त्या नेहमी अग्रेसर असतात. पर्वतीमधील नागरिकांना त्या सहज उपलब्ध होतात. त्यामुळे नागरिकांचा कदम यांना पाठिंबा आहे. त्यातच मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला आहे. मातंग एकता आंदोलन, दलित युवक आंदोलन, कष्टकरी पथारी व्यवसाय पंचायत,  हमाल पंचायत आणि श्री छत्रपती शिवाजी कामगार युनियन मार्केटयार्ड यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे कदम यांना समाजातील सर्व घटकामधुन वाढता पाठिंबा मिळत असल्यामुळे येथे परिवर्तनाची लाट आली आहे.

जनता वसाहत येथे उमेदवार अश्विनी कदम यांचे स्वागत करून महिलांनी औक्षण केले. त्यावेळी नगरसेविका प्रियाताई गदादे पाटील, शिवाजी गदादे ,विनायक हनमगर,प्रवीण चव्हाण, समीर पवार, निलेश पवार, प्रदीप शिवचरण, सोहन वजरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com