Vidhan Sabha 2019 : मावळमध्ये भाजपला दणका; भाजपनेत्याला राष्ट्रवादीची उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

मावळमध्ये भाजपला मोठा दणका बसला असून भाजपा नेते आणि मावळचे माजी उपनगराध्यक्ष सुनिल शेळके यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

मुंबई : मावळमध्ये भाजपला मोठा दणका बसला असून भाजपा नेते आणि मावळचे माजी उपनगराध्यक्ष सुनिल शेळके यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सेना-भाजपाच्या नेत्यांची प्रवेश करण्यासाठी रांग लागली असून आज सकाळी पालघरचे शिवसेना आमदार अमित घोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. तर, मावळचे भाजपा नेते सुनिल शेळके यांनी आज दुपारी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

दरम्यान, मावळ मतदारसंघातून सुनिल शेळके यांना राष्ट्रवादीच्यावतीने उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जाहीर प्रवेश पार पडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha BJP leader sunil shelke enters in NCP