

Explosive-Like Material Found Near Saikrupa Lodge in Vidyanagar
Sakal
विश्रांतवाडी : टिंगरेनगर येथील विद्यानगर गल्ली क्र. 8 येथील साईकृपा लॉजजवळ बॉम्बमध्ये वापरण्यात येणारे जिलेटिन व वायर आढळून आल्या. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी तत्परतेने परिसर पिंजून काढला. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास टिंगरेनगर येथे विद्यानगर आरोग्य कोठीमधील सफाईसेविका झाडणकाम करीत असताना या ठिकाणी मोकळ्या प्लॉटच्या पत्र्याच्या गेटजवळच्या एक पोते रस्त्यावरील पदपथाच्या बाजूला ठेवलेले दिसून आले.