

Fadnavis on Vidyanand Bapat
Esakal
डीजेविरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांना पुण्यात झालेल्या मारहाणीची गंभीर दखल राज्याच्या गृहमंत्रालयानं घेतलीय. विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुण्यात विद्यानंद बापट यांच्यावर हल्ल्यानंतर मुख्यमंत्री फडणीस यांनी प्रतिक्रिया देताना अखी मारहाण योग्य नसल्याचं म्हटलंय. पुण्यातील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी बापट यांच्या हल्ल्यानंतर सरकारने तातडीची कारवाई केल्याची माहिती दिलीय. यापुढे विद्यानंद बापट यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानुसार पोलीस संरक्षण असणार आहे.