
"Vietnam-Style Fully Automated Cashew Project Proposed in Konkan"
Sakal
मार्केट यार्ड : ‘कोकणामध्ये व्हिएतनामच्या धर्तीवर संपूर्ण स्वयंचलित काजू प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी नियोजन करण्यात यावे,’ अशी सूचना राज्याचे पणनमंत्री आणि महाराष्ट्र राज्य काजू परिषदेचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी दिली. ते पुण्यात झालेल्या महाराष्ट्र राज्य काजू परिषदेच्या संचालक मंडळाच्या सभेत बोलत होते.