New Born Baby Life Saving
sakal
बारामती - शहरातील तांदूळवाडी येथील जुन्या रेल्वे पुलाखाली नवजात अर्भक टाकून दिल्याची घटना बुधवारी (ता. १९) सकाळी उघडकीस आली. दक्ष नागरिकांनी बारामती तालुका पोलिसांना तत्काळ माहिती दिल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भकाला ताब्यात घेऊन उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वेळीच मिळालेल्या मदतीमुळे अर्भकाचे प्राण वाचले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.