Vigyan Ashram Exhibition : विज्ञान आश्रमच्या दोन दिवसीय प्रदर्शनाला १२ हजार विद्यार्थ्यांची भेट; जयेश धायरकर व अक्षय सावंत यांना युवा उद्योजक-संशोधक पुरस्कार

डॉ. एस.एस. कलबाग स्मृतिदिनानिमित्त विज्ञान-आश्रमच्या दोन दिवसीय प्रदर्शनाला राज्यभरातील ११० शाळांमधील १२ हजार विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती, १५५ यशस्वी प्रयोगांचे प्रात्यक्षिक
More than 12,000 students from 110 schools visited the two-day science exhibition organised by Vigyan Ashram at Pabal in memory of Dr. S. S. Kalbag.

More than 12,000 students from 110 schools visited the two-day science exhibition organised by Vigyan Ashram at Pabal in memory of Dr. S. S. Kalbag.

Sakal

Updated on

शिक्रापूर : थोर शास्त्रज्ञ तथा विज्ञान आश्रमचे संस्थापक डॉ.एस.एस.कलबाग यांच्या २३ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित विविध क्षेत्रातील विज्ञान आश्रममधील संशोधनांवर आधारीत १५५ यशस्वी प्रयोगांच्या जाहीर दोन दिवशीय प्रदर्शनाला यावर्षी राज्यभरातून ११० शाळांतील सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. दरवर्षी याच दिवशी डॉ.कलबाग यांच्याच नावाने दिला जाणारा या वर्षीचा युवा उद्योजक पुरस्कार तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील जयेश धायरकर याला तर युवा संशोधक म्हणून वेळापूर (जि.सोलापूर) येथील अक्षय सावंत यांना मुख्य संचालक डॉ. योगेश कुलकर्णी, अशोक कलबाग व डॉ.अरुण दिक्षित यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com