विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव
Published on

PNE26W4366 विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव
मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
उपाध्यक्षपदी उमाताई देगीनाळ, गिरीश मंद्रूपकर; सचिवपदी सागर पुकाळे
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २० : विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी उमाताई देगीनाळ व गिरीश मंद्रूपकर, तर सचिवपदी सागर पुकाळे यांची निवड झाली.
ट्रस्टचे प्रमुख शिवशरण बिराजदार पाटील अध्यक्षस्थानी होते. संस्थापक सदस्य विजय शाबादी, ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. मल्लिकार्जुन तरनळळी, डॉ. बसवराज बगले, अशोक भांजे, अंबादास कोळी आदी उपस्थित होते.
विजय शाबादी यांनी मागील वर्षातील उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन ट्रस्टचे सचिव विश्वनाथ आमणे यांनी केले. नूतन कार्यकारिणीत कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत पुजारी, सहसचिव गोविंद राठोड व अजिंक्य उप्पीन, कोषाध्यक्ष प्रसाद गाजरे, सहकोषाध्यक्ष राचप्पा कटारे, सांस्कृतिक प्रमुख राजेंद्र मुलगे, महिला विभागप्रमुख प्रांजली मोहिकर व प्रीती उडानशिव, मिरवणूक प्रमुख प्रदीप सुरवसे आणि क्रीडा व मिरवणूक समितीप्रमुख बसवराज नालवार यांचा समावेश आहे.
---------------------------
देणगीतून कार्यालय साकारणार
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे कार्यालय सुरू करण्याचा संकल्प ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी जाहीर केला. त्यासाठी त्यांनी देणगी जाहीर केली. विश्वस्त शिवशरण बिराजदार पाटील, नूतन अध्यक्ष विश्वनाथ कोळी, डॉ. बसवराज बगले आणि कोळी समाजाचे राज्य पदाधिकारी अंबादास कोळी यांनीही देणगी जाहीर केली. कै. राजेश शाबादी यांच्या स्मरणार्थ शाबादी परिवारातर्फे बी.एस्सी. शिक्षणासाठी एका विद्यार्थिनीला ११ हजार रुपयांची मदत देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com