पंतप्रधान सहाय्यता निधीला विजय पुसाळकर यांची एक कोटी रुपयांची मदत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

कोरोनाच्या भीषण संकटातून सावरण्यासाठी सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून पुसाळकर यांनी ही मदत पंतप्रधान सहायता निधीस सुपूर्द केली.यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महाराष्ट्र स्टेट क्रिकेट असोसिएशनचे विकास काकतकर,पुना क्लबचे अध्यक्ष राहुल ढोले पाटील,निवृत्त पोलीस उपायुक्त सुरेश केकाण उपस्थित होते.

पुणे : कोरोनाच्या भीषण आपत्तीवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मदतीच्या आवाहनाला साद देत पुण्यातील इंडो शॉट ले या कंपनीचे अध्यक्ष विजय पुसाळकर यांनी आज एक कोटी रुपयांचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द केला. 
 
lay.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal&hl=en" target="_blank">बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या भीषण संकटातून सावरण्यासाठी सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून पुसाळकर यांनी ही मदत पंतप्रधान सहायता निधीस सुपूर्द केली.यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महाराष्ट्र स्टेट क्रिकेट असोसिएशनचे विकास काकतकर,पुना क्लबचे अध्यक्ष राहुल ढोले पाटील,निवृत्त पोलीस उपायुक्त सुरेश केकाण उपस्थित होते.
 
मोठी बातमी : मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दारावर कोरोनाची धडक

 कोरोनाच्या आपत्तीवर मात करण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असून याप्रसंगी दानशूर व्यक्ती,सामाजिक संस्था मदतीसाठी स्वयं स्फूर्तीने पुढे येत आहे हे समाजातील सकारात्मकतेचे प्रतीक असल्याचे सांगून डॉ. म्हैसेकर यांनी अधिकाधिक सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Pusalkar assistance of Rupees one crore to the Prime Minister Assistance Fund