
अत्रे भवनात शिवतारे यांच्या हस्ते तालुक्यातील शिवसेनेच्या ३० सरपंच, ३४ उपसरपंच आणि शेकडो सदस्यांचा सत्कार समारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.
'...तर मी नंगा नाच करेन'; असं का म्हणाले विजय शिवतारे?
सासवड (पुणे) : आम्ही पुरंदरच्या सर्वांगीन विकासासाठी आणलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ जर कोणी दुसऱ्याच्या भल्यासाठी दुसऱ्या जागेत नेले, तर मी प्रसंगी नंगा नाच करेन. गुंजवणी प्रकल्पासाठी मी माझ्या किडन्या घालविल्या. विमानतळासाठी प्राण पणाला लावेल, असे सांगत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सर्वपक्षीयांना आवाहन केले की, तालुक्यासाठी साऱ्यांनी जागे व्हा. मी शेतकऱ्यांची माफी मागतो, पण कुणी पुढच्या पिढीचा विकास हिरावून घेऊ नका.
- पूजाच्या हत्येचा कट? रूम भाड्याचा करार ते आत्महत्या; घटनाक्रमामुळे संशय
सासवड (ता. पुरंदर) येथील अत्रे भवनात डायलेसिस उरकून आल्यानंतर शिवतारे यांच्या हस्ते तालुक्यातील शिवसेनेच्या ३० सरपंच, ३४ उपसरपंच आणि शेकडो सदस्यांचा सत्कार समारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सत्यवान उभे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, तालुकाप्रमुख दिलीप यादव, सभापती नलिनी लोळे, अतुल म्हस्के, दत्तात्रय काळे, अर्चना जाधव, रमेश जाधव, गोरशनाथ माने, शिवाजी पवार, युवासेनेचे अध्यक्ष मंदार गिरमे, नगरसेवक सचिन भोंगळे, सासवड शहरप्रमुख अभिजित जगताप, जेजुरी शहरप्रमुख विठ्ठल सोनवणे यांच्यासह गावोगावचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
- न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे पुण्यात निधन
शिवतारे यांनी नव्याने सुचवलेल्या राजुरी, रिसे, पिसे, नायगाव, पांडेश्वर, मावडी, पिंपरी या गावात विमानतळ करण्यास स्पष्ट विरोध दर्शविला. हे विमानतळ दुसरीकडे नेण्याचे षड्यंत्र आहे, ते हाणून पाडू, असे सांगत शिवतारे म्हणाले, उजनी धरणाला शेतकरी आणि वारकऱ्यांनी मोठा विरोध केला होता. यशवंतराव चव्हाण भूमिपूजन करण्याआधी थेट पांडुरंगाच्या दारात गेले. पांडुरंगाची माफी मागितली आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीच तुझी चंद्रभागा अडवत असल्याचे पांडुरंगाला सांगितले. मीसुद्धा आज पुरंदरच्या त्या पहिल्या जागेतील शेतकऱ्यांची माफी मागतो, पण विमानतळ हे आपल्याच भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आहे. पारगाव वगळून जुन्याच ठिकाणी विमानतळ व्हावं ही गरज आणि लोकभावना आहे. नवीन जागेत विमानतळ गेल्यास त्याचा फायदा आपल्या तालुक्याला होणार नाही. शिवतारे म्हणाले, गुंजवणीचं पाणी आता कुणी रोखू शकत नाही. पाईपलाईनचं काम सुरू आहे. वांगणी, वाजेघर आणि शिवगंगा खोऱ्यातील गावांनाही पाणी मिळणार असून मी स्वतः या साऱ्या बाबी कानावर घालण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. मुख्यमंत्री आपला आहे, तळागाळातील शिवसैनिकांनी अजून गतीने काम करावे.
- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; कोण आहे अरुण राठोड?
एकटे या... बघा पराभव कोणाचा होतो
आमदार संजय जगताप यांचे नाव न घेता शिवतारे म्हणाले, कोविडच्या अडचणीमुळे तुम्हाला निधी मिळत नाही. बारामती, इंदापूरला कसा मिळतो? मी मंजूर करुन आणलेलीच कामे तुम्हाला पुरतील. एक नवा पैसा देखील हे सव्वा वर्षात आणू शकले नाहीत. मी आणलेले प्रकल्प अडविण्यापेक्षा तुमचा एखादा प्रकल्प आणा. तुम्ही एकटे या अन् मी एकटा येतो, पराभव कोणाचा होतो बघा. माझी तर पालखी तळावर आता एका व्यासपीठावर येण्याची तयारी आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
Web Title: Vijay Shivtare Has Warned Opposition About Ongoing Politics Regarding Purandar Airport
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..