
'हेवन' याचा अर्थ स्वर्ग असा होता आणि पूजा याच ठिकाणी स्वर्गवासी झाली. याबाबत रूम मालक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवरीला अरुण राठोड याला 11 महिने करार करून फ्लॅट भाड्याने दिला होता. 15 हजार डिपॉझिट व 6 हजार रूम भाडही ठरलं होतं.
पूजाच्या हत्येचा कट? रूम भाड्याचा करार ते आत्महत्या; घटनाक्रमामुळे संशय
पुणे : पूजा चव्हाण हिच्या मृत्यचं गूढ अजून कायम असून गुंतागुंत वाढत आहे. पुजा राहात असलेल्या 'हेवन पार्क' सोसायटीतील रहिवासी याबाबत काही बोलायला तयार नाहीत आणि जे बोलत आहे तेही अर्धवट. रहिवाशांवर कोणाचा दबाव आहे का? पूजा चव्हाण 30 जानेवारीला पुण्यातील 'हेवन पार्क'मध्ये राहायला आली होती आणि 7 दिवसांमध्ये तिने उडी मारुन आत्महत्या केली. पूजाच्या मृत्यूनंतरही तिची दुचाकी गाडी अजूनही पार्किंगमध्ये आहे.
टिक टॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; राज्यातील मंत्री अडचणीत ?
'हेवन' याचा अर्थ स्वर्ग असा होता आणि पूजा याच ठिकाणी स्वर्गवासी झाली. याबाबत रूम मालक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवरीला अरुण राठोड याला 11 महिने करार करून फ्लॅट भाड्याने दिला होता. 15 हजार डिपॉझिट व 6 हजार रूम भाडही ठरलं होतं.1 जानेवरीला अरुण राठोड हा हेवन पार्कमध्ये राहायला आला होता. त्याच्या सोबत त्याचा मित्र ही आला होता. 30 जानेवारीला पूजा त्या फ्लॅटवर राहायला आली होती. दरम्यान, फ्लॅटवर मुलगी राहत असल्याची समजताच त्यांनी रूमवर जाऊन चौकशीही केली तेव्हा अरुण राठोड व पूजा चव्हाण हे भाऊ बहीण नसल्याचं समजलं. त्यानंतर त्यांना रूम खाली करायला सांगितली. लगेच रुम मिळणार नसल्याचं असे सांगून अरुण याने 10 दिवसाची मुदत घेतली होती आणि याच दरम्यान, हा प्रकार घडला.
कोण आहे टिक-टॉक स्टार पुजा चव्हाण?
दरम्यान, याबाबत बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना कोणतीही माहिती नव्हती. मात्र, पूजा चव्हाणच्या शेजारील एका महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ''1 महिने झाला होता 2 मुलं राहात होती. ज्या दिवशी घटना घडली तेव्हा समजलं की, त्यांच्या बरोबर मुलगीही राहतेय. आम्ही कधी बोलोही नाही पण, ते कधी तरी दिसत होते. या प्रकरणात शेजारी किंवा इतर कोणी काहीच माहिती देत नसल्याने कोणाचा दबाव आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. अरुण राठोड हा कुठं तरी कामाला जात होता. एक महिन्यापासून पूजाच्या हत्येचा कट तर झाला नव्हता ना? अस प्रश्न उपस्थित होतो.
- पोलिस कमिशनर ऑफिसमध्येच एकाचा आत्महत्येचा प्रयत्न; पुण्यातील घटना
Web Title: Pooja Chavan Arun Rathod Heaven Park Wanwadi Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..