अखेर कट्टर विरोधक असलेले अजितदादा व विजय शिवतारे आले समोरासमोर...

श्रीकृष्ण नेवसे 
Tuesday, 22 September 2020

पुरंदर तालुक्यात कोरोनाने मोठी उसळी घेतली असून मृत्यू दरही वाढला आहे. संसर्गातून बेजार झालेल्या  तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी माजी राज्यमंत्री व शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. 

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यात कोरोनाने मोठी उसळी घेतली असून मृत्यू दरही वाढला आहे. संसर्गातून बेजार झालेल्या  तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी माजी राज्यमंत्री व शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाने तालुक्यात झालेल्या भीषण परिस्थितीची माहिती आपण अजित पवार यांना दिली. येथे पुरंदरला विविध उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने लक्ष घालण्याची विनंती केल्याचेही शिवतारे यांनी सांगितले. याबाबत शिवतारे पुढे म्हणाले, माझी किडनी निकामी असल्यामुळे संसर्गाचा धोका टाळण्यासाठी मला सार्वजनिक जीवनात जाण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे. काल पाच तास डायलिसिस करून मी सायंकाळी चार वाजता अजित पवारांची भेटीला गेलो. माझी मला चिंता आहे; पण दुसरीकडे तालुक्यातील कोरोना संसर्ग, वाढती कोरोनाबाधीत संख्या, कोविड केअर सेंटरमधील अपेक्षित सुविधांची कमतरता, अपुरे बेड, हाॅस्पिटल बेडची कमी उपलब्धता आदी प्रकाराने परिस्थिती गंभीर बनली आहे.  

ऑनलाइन शाळेसाठी पालक आग्रही; मात्र शाळांचा नकार

तालुक्यातील कोरोना विरुद्धच्या लढाईचा आढावा घेत पालकमंत्री पवार यांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून दिलं आहे. शिवाय योग्य त्या अनेक उपाययोजना सांगितल्या आहेत. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासन पुढे लवकरात लवकर हालचाली करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करेल, अशी अपेक्षा आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवार यांनाही भेटणार..

दरम्यान लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही भेटणार असल्याचे शिवतारेंनी सांगितले. कोविड आटोक्यात आणण्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न करणार असल्याचे शिवतारे म्हणाले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Shivtare met Ajit Pawar