

Bail Opposition: Pune Police Strongly Oppose Bail for NCP Spokesperson Vikas Lawande
esakal
पुणे : वारकरी संप्रदायाविषयी वादग्रस्त व्यक्तव्य केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन देण्यास पुणे पोलिसांनी सोमवारी न्यायालयात विरोध केला. लवांडे तक्रारदार, साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात; तसेच आषाढी एकादशीनिमित्त आगामी वारी सोहळ्याच्या काळात अशा वक्तव्याची पुनरावृत्ती झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी कारणे देत वाघोली पोलिसांनी लवांडेंचा जामीन अर्ज नामंजूर करण्याची मागणी न्यायालयात केली.