
Village Development
Sakal
काटेवाडी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींना कामाच्या गुणवत्तेनुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे पाच कोटी, तीन कोटी आणि दोन कोटी रुपयांची पारितोषिके जिंकण्याची संधी आहे. या अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामपंचायतींनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी किशोर माने यांनी केले.