esakal | गावांच्या समृद्धीसाठी चतुःसूत्रीचा अवलंब हवा - नितीन गडकरी
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin-Gadkari

गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंचांनी अर्थव्यवस्था, पर्यावरण, वातावरण आणि नीतिमत्ता या चतुःसूत्रीचा अवलंब करावा, असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (ता. 4) सरपंचांना दिला. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्यावतीने आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय सरपंच संसदेच्या समारोपप्रसंगी गडकरी हे सरपंचांना ऑनलाइन मार्गदर्शन करत होते.

गावांच्या समृद्धीसाठी चतुःसूत्रीचा अवलंब हवा - नितीन गडकरी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंचांनी अर्थव्यवस्था, पर्यावरण, वातावरण आणि नीतिमत्ता या चतुःसूत्रीचा अवलंब करावा, असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (ता. 4) सरपंचांना दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्यावतीने आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय सरपंच संसदेच्या समारोपप्रसंगी गडकरी हे सरपंचांना ऑनलाइन मार्गदर्शन करत होते. त्यावेळी त्यांनी हा सल्ला दिला. ही तीन दिवसीय परिषद ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय कृषी व पंचायतराज मंत्री नरेंद्रसिंग तोमर, राज्यमंत्री प्रतापचंद्र सरंगी, प्रदीप जैन, माजी केंद्रीय मंत्री हुकुमदेव यादव,जम्मू-काश्‍मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड, खासदार पी.पी.चौधरी, बायफचे विश्वस्त किशोर ए चकुर, सरपंच संसदेचे प्रमुख संयोजक राहुल कराड, प्रमुख समन्वयक योगेश पाटील, कुलगुरू डॉ.एन.टी.राव, रवींद्रनाथ पाटील आणि डॉ. शैलश्री हरिदास आदी उपस्थित होते.

पेपर पूर्ण सोडवून देखील शून्य गुण मिळालेच कसे

गडकरी म्हणाले, 'गावातील व्यक्ती शहरात गेल्याने शहरातही बेरोजगारीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. यासाठी गावातच योग्य कौशल्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली पाहिजे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे गावात 24 तास वीज, चांगले रस्ते, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि योग्य कनेक्‍टिव्हिटी मिळविणे सोपे झाले आहे. सरपंचांनी या सर्व बाबी गावात निर्माण केल्यास गाव समृद्ध होईल.''

राज्यात ऑनलाइन रोजगार महामेळाव्याचे आयोजन; 65 ते 70 हजार रिक्‍त जागा भरणार

ग्राम विकासासाठी सरपंचांनी चिंतन, मनन आणि चर्चा या गोष्टींवर भर दिला पाहिजे. त्यातूनच आध्यात्मिक शक्ती व नैतिकता समाजाला मजबूत करते. यासाठी गावाच्या विकासाचा आराखडा तयार करावा. विकास, संतुलन आणि सर्वांच्या सहयोगावर ग्राम विकासाचे सूत्र आधारित आहे. गावांच्या विकासाला गती देण्यासाठी 13 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींसाठी 65 हजार कोटी, 14 व्या वित्त आयोगातून 2 लाख कोटी तर, 15 व्या वित्त आयोगातून 3 लाख कोटीपेक्षा अधिक रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे पंचायतराज मंत्री तोमर यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top