हिर्डोशी - उत्रौली (ता. भोर) येथील समृद्धी शिवतरे हिची हॉटेल मॅनेजमेंट कल्नरी आर्ट या विषयाच्या अभ्यास दौऱ्यासाठी फ्रान्स देशात निवड झाली आहे. शेतकरी कुटुंबातील समृद्धीचे वडील संजय शिवतरे हे ३० वर्षांपासून दुग्ध व्यवसाय करत असून आई मालन या गृहिणी आहेत.