

Leopard and cub spotted during funeral procession in Ambegaon taluka create panic among villagers
Sakal
पारगाव : आंबेगाव तालुक्यातील टाव्हरेवाडी व गावडेवाडीच्या हद्दीवर असलेल्या माथावस्ती येथे अंत्ययात्रा रस्त्याने जात असताना अचानक रस्त्याच्या कडेच्या शेतातून बिबट मादी व तिचा बछडा बाहेर आल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने काही क्षणातच बिबट्या व बछडा शेजारच्या ऊसाच्या शेतात गेल्याने मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.