esakal | अरे वा ! सपकळवाडीकरांनी उभारले स्वत:चे आयसोलेशन सेंटर 
sakal

बोलून बातमी शोधा

sapkalwadi.jpg

इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी गावाने ‘माझे गाव- माझी जबाबदारी‘ ही नावीन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. त्यानुसार येथील ग्रामस्थांनी सरकारचा एक रुपयाचा निधी न घेता सामाजिक संस्था व दानशूर व्यक्ती यांच्या मदतीने गावामध्येच १० बेडचे आयसोलेशन सेंटर (विलगीकरण कक्ष) सुरु केले आहे. 

अरे वा ! सपकळवाडीकरांनी उभारले स्वत:चे आयसोलेशन सेंटर 

sakal_logo
By
राजकुमार थोरात

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी गावाने ‘माझे गाव- माझी जबाबदारी‘ ही नावीन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. त्यानुसार येथील ग्रामस्थांनी सरकारचा एक रुपयाचा निधी न घेता सामाजिक संस्था व दानशूर व्यक्ती यांच्या मदतीने गावामध्येच १० बेडचे आयसोलेशन सेंटर (विलगीकरण कक्ष) सुरु केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामती व इंदापूर या दोन्ही तालुक्यातील कोरोनागस्त रुग्णांची संख्या साडेचार हजाराच्या जवळ पोचली आहे. मात्र, या तालुक्यांच्या सीमेवर असणाऱ्या सपकळवाडी गावात मात्र आजही कोरोनाचा एकही रुग्ण नाही. राज्य सरकारने माझे कुटुंब- माझी जबाबदारी अभियान सुरु केले आहे. मात्र, सपकळवाडी गावाने माझे गाव- माझी जबाबदारी, हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. त्यानुसार गावामध्ये प्राथमिक शाळेमध्ये १० बेडचे आयसोलेशन सेंटर सुरु केले आहे. त्यासाठी गावाने सरकारची एकही रुपयाची मदत अथवा निधी घेतलेला नाही. 

आरोग्य सुविधांचे ‘ऑपरेशन’ गरजेचे! 

गावामध्ये एखादा कोरोनाचा रुग्ण आढळल्यास त्याच्यावरती गावामध्ये उपचार करण्यात येणार आहेत. त्यासाठी रोटरी क्लब बारामती यांनी मदत केली असून, १० बेड व मास्क उपलब्ध करून दिले आहे. तसेच, इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात दिला असल्याचे माजी सरपंच सचिन सपकळ यांनी सांगितले.