esakal | रस्त्यावर चिखलातून गाड्या पळविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्याचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामस्थांचा इशारा

रस्त्यावर चिखलातून गाड्या पळविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्याचा इशारा

sakal_logo
By
राजकुमार थोरात - सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : ढेकळवाडी ते भवानीनगर दरम्यानच्या १०० वर्षापूर्वीच्या रस्ता काही शेतकऱ्यांनी अडविला असून रस्त्याचे काम मार्गी न लागल्यास २० सप्टेंबर रोजी रखडलेल्या रस्त्यावर चिखलातून गाड्या पळविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्याचा इशारा ढेकळवाडीच्या ग्रामस्थांनी दिला.

हेही वाचा: Pune : गणेशमूर्ती विसर्जनाची १०७ ठिकाणी व्यवस्था

ढेकळवाडी- भवानीनगर हा १०० वर्षापूर्वीचा जुना रस्ता आहे. सध्या रस्त्याची दुरावस्था झाली असून नागरिकांना रस्त्याने ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पर्यायी रस्ता नसल्याने नागरिकांना काटेवाडी मार्ग वळसा घालून भवानीनगर यावे लागत आहे. या रस्त्याच्या कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ कोटी रुपयांची तरतुद केली आहे. मात्र रस्त्याचे काम अद्याप सुरु झाले नसून अधिकारी ही बघ्याची भूमिका घेत आहेत.

हेही वाचा: डेक्कन आयटीएफमध्ये मिळाले सर्वात मोठे ‘टायटल’

ढेकळवाडी ते भवानीनगर रस्त्याचे काम सुरु करणण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असून रस्त्याचे काम सुरू न झाल्यास २० सप्टेंबर रोजी खराब असलेल्या रस्त्यावरुन चिखलातून गाड्या पळवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविणणाऱ्या स्पर्धकाला तीन हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका निरीक्षक बापुराव सोलनकर यांनी सांगितले.यासंदर्भातील निवेदन प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे देणण्यात आले आहे. यावेळी संपत टकले, शुभम ठोंबरे, शिवाजी लकडे, रामदास पिंगळे, बाळासाहेब बोरकर, नामदेव ठोंबरे, सुभाष ठोंबरे, संजय टकले उपस्थित होते.

loading image
go to top