पुणे - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी लंडनमध्ये बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते व खासदार राहुल गांधी यांना सक्षम अधिकारी किंवा न्यायशास्त्र प्रयोगशाळेसमोर (एफएसएल) त्यांच्या आवाजाचा नमुना द्यावा..सक्षम न्यायवैद्यक प्राधिकरणाला पूर्वीच रेकॉर्डवर असलेल्या रेकॉर्डिंगसह संकलित केलेल्या नमुन्याचे वैज्ञानिक विश्लेषण आणि तुलना करण्याचे निर्देश द्यावेत, असा अर्ज फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी आज विशेष न्यायालयात सादर केला आहे.राहुल गांधी यांनी मार्च २०२३ मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक विधान केल्याच्या आरोपावरून सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे..येथील एमपीएमएलए विशेष न्यायालयात या दाव्याची सुनावणी सुरू आहे. बचाव पक्षाकडून फिर्यादी सात्यकी सावरकर यांची उलट तपासणी चालू आहे. सुनावणीदरम्यान सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी न्यायालयात राहुल गांधी यांच्या आवाजाचे नमुने घेण्यासंबंधीचे निर्देश द्यावेत असा अर्ज केला आहे.न्यायालयाला आरोपी किंवा साक्षीदाराला असे नमुने देण्यास भाग पाडण्याचे पुरेसे अधिकार आहेत. संशयिताची ओळख पटविण्यासाठी एकट्याने केलेल्या गुन्ह्याच्या कबुलीऐवजी वैज्ञानिक तुलना करून आलेला पुरावा महत्त्वाचा असतो, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे..गोपनीय अहवाल न्यायालयात सादर करावा - बचाव पक्षराहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी फिर्यादी सात्यकी सावरकर यांची उलटतपासणी घेतली. सात्यकी सावरकर यांनी तत्कालीन न्यायाधीशांवर गंभीर आक्षेप घेत, हे प्रकरण दुसरीकडे वर्ग करण्याबाबत प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे अर्ज केला होता. खटला दुसऱ्या सक्षम न्यायालयात वर्ग होईपर्यंत सुनावणी स्थगित करण्याची मागणीही त्यावेळी करण्यात आली होती..त्या अर्जाची दखल घेत प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी तत्कालीन न्यायाधीशांकडून गोपनीय अहवाल मागवला होता. तो अहवाल न्यायालयात सादर करण्यात यावा, असा अर्ज अॅड. पवार यांनी केला आहे. त्यावर पुढील सुनावणी २३ फेब्रुवारीला होणार आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.