esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Vinayak Mete gives statement  regarding Maratha reservation in pune

- सरकारकडून न्यायालयात सदोष याचिका दाखल
- शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचा आरोप

हे सरकार मराठा तरुणांच्या आयुष्याशी खेळतेय : विनायक मेटे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्ला चढविला. 'मराठा आरक्षणावरील तात्पुरती स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सदोष याचिका दाखल केली आहे. हे सरकार मराठा समाजातील तरुणांच्या आयुष्याशी खेळत आहे,' असा गंभीर आरोप मेटे यांनी केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मराठा आरक्षणाबाबत पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मेटे म्हणाले, राज्य सरकारने 28 जुलै 2020 च्या परिपत्रकातून मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून वगळण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयातून मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारने सारवासारव सुरू केली आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, 'सारथी' संस्था, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह योजनेसाठी निधी मंजूर केला. मात्र, मराठा समाजातील तरुणांची संख्या पाहता या योजनांमधील निधी पुरेसा नाही. तसेच या निधीचा वापर कसा करणार याबाबत सरकारकडून स्पष्टता नाही.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यात शनिवारी विचार मंथन बैठक :
मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात एकसूत्रता येण्यासाठी शनिवारी (ता.3) पुण्यात विचार मंथन करण्यात येणार आहे. या बैठकीस मराठा समाजातील माजी न्यायमूर्ती, विचारवंत, तज्ज्ञ, विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, असे मेटे यांनी सांगितले.
 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image
go to top