esakal | विनोबा भावे विसाव्या शतकातील ऋषी
sakal

बोलून बातमी शोधा

pune

विनोबा भावे विसाव्या शतकातील ऋषी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे शिष्य विनोबा भाव हे विसाव्या शतकातील सर्वांत मोठे ऋषी होते. त्यांच्यात ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही गोष्टींचा समावेश होता. ते प्रत्येक कार्यात स्वतःला वाहून घेऊन कार्याला सुंदर अंतिम रूप देत होते,’’ असे प्रतिपादन सिंबायोसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि शारदा ज्ञान पीठम्‌तर्फे शारदा ज्ञानपीठम्‌च्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त ऋषी पंचमीच्या दिवशी विविध क्षेत्रांतील ८० ते ९७ वर्षे वयाच्या तपस्वीचा सन्मान करण्यात आला. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर होते. या वेळी शारदा ज्ञान पीठम्‌चे संस्थापक पं. वसंतराव गाडगीळ, विश्वस्त श्रीवर्धन गाडगीळ, सुनीलकुमार थिगळे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: Pune : एअर मार्शल चौधरी यांची देखभाल-दुरुस्ती केंद्रास भेट

कार्यक्रमात मराठी व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख, मुद्रण महर्षी श्रीविष्णू भंडारे, केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) निवृत्त संचालक पं. विद्याधर गोविंद वैद्य, श्रीमोरया गोसावी संस्थानचे पूर्वाध्यक्ष पं. विघ्नहरी महाराज देव, निवृत्त वनाधिकारी वसंत जोशी, ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना प्रभू, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत, निर्मलाताई गोगटे, यशवंत पाळंदे, पं. उस्मान खान साहेब, गणेश शास्त्री करंबेकर, जयराम फगरे यांचे पूजन करून सत्कार करण्यात आला. तसेच निवृत्त पोलिस महासंचालक ज्युलिओ रिवेरो (मुंबई), लोकारोग्य सेवा तपस्वी डॉ. माधव चौधरी (अकोला), यांचा ऑनलाइनद्वारे सत्कार करण्यात आला.

डॉ. मुजुमदार म्हणाले, ‘‘एका विषयात संपूर्ण आयुष्य झोकून कार्य करणारे हे ऋषी नव्या पिढीला खूप मोठा संदेश देऊन जातात. त्यामुळेच विद्यार्थ्यांसमोर हा आदर्श ठेवणे गरजेचे आहे.’’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद पांडे यांनी, तर सूत्रसंचालन श्रीवर्धन गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.

loading image
go to top