esakal | अजितदादांना भोरकरांचा ‘कात्रजचा घाट’

बोलून बातमी शोधा

Violation of the order of Ajit pawar for the third time during the election of the Speaker }

भोरच्या सभापतिपदी यापूर्वी दोन वेळा अजित पवार यांचा आदेश डावलला गेला. राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीमुळे सन २००२ मध्ये मानसिंग धुमाळ आणि सन २००७ मध्ये रणजित शिवतरे यांना सभापतिपदापासून दूर राहावे लागले आणि आता तिसऱ्या वेळी लहू शेलार यांना सभापतिपदापासून दूर राहावे लागले.

अजितदादांना भोरकरांचा ‘कात्रजचा घाट’
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भोर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ‘दादा’ नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाचे भोर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांकडून अनेक वेळा उल्लंघन होत आले आहे. नुकत्याच झालेल्या सभापतिपदाच्या निवडणुकीवेळीही ते दिसून आले. त्यातून तालुक्यातील राष्ट्रवादी कॉग्रेसमधील गटबाजीही उघड झाली आहे. पक्षाने चारही सदस्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावलेली आहे. परंतु, पक्षाकडून त्यांच्यावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भोरच्या सभापतिपदी यापूर्वी दोन वेळा अजित पवार यांचा आदेश डावलला गेला. राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीमुळे सन २००२ मध्ये मानसिंग धुमाळ आणि सन २००७ मध्ये रणजित शिवतरे यांना सभापतिपदापासून दूर राहावे लागले आणि आता तिसऱ्या वेळी लहू शेलार यांना सभापतिपदापासून दूर राहावे लागले. राष्ट्रवादीच्या या अंतर्गत गटबाजीमुळे पक्षातून काही पदाधिकारी इतर पक्षात गेले. याची किंमतही राष्ट्रवादीला काही प्रमाणात मोजावी लागली आहे. आताही अजित पवार पक्षादेश न मानणाऱ्यांवर काय कारवाई होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

भोर पंचायत समितीमध्ये सहा सदस्यांपैकी ४ सदस्य राष्ट्रवादीचे आणि कॉग्रेस व शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य आहे. या वेळी सभापतिपदासाठी राष्ट्रवादीकडून लहू शेलार यांचे नाव आले होते. तसा व्हीप पक्षाने बजावला होता. मात्र, बंडखोरी करत दमयंती जाधव या सभापती झाल्या. पंचायत समितीच्या सन २१०७ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या मंगल बोडके सभापती झाल्या. त्यांना सव्वा वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. त्या अडीच वर्षे सभापतिपदी राहिल्या. त्यानंतर अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत उर्वरित अडीच वर्षे श्रीधर किंद्रे व लहू शेलार यांना देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर श्रीधर किंद्रे हे सभापती व दमयंती जाधव या उपसभापती झाल्या. किंद्रे यांनीही काही घडामोडींनंतर राजीनामा दिला. त्यानंतर जाधव यांनी किंद्रे यांच्या सहकार्याने पक्षाविरूद्ध बंड करून सभापतिपद मिळविले. त्यांना राष्ट्रवादीचे आणखी काही पदाधिकारी सहकार्य करीत असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे.

नेत्यांची मने जुळणार का?
भोर नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या आठ नगरसेवकांचे सदस्यत्व पक्षाचा व्हीप न पाळल्यामुळे रद्द झाले होते. याची जाणीव असूनही सभापतिपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या व्हीपचे पालन झाले नाही. त्यामुळे कारवाई होईल की
नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, राष्ट्रवादीचे स्थानिक नेते जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, युवा नेते विक्रम खुटवड, माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाठे, माजी उपसभापती मानसिंग धुमाळ, विद्यमान तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे यांच्यामध्ये एकसूत्रीपणा ठेवण्यासाठी अजित पवार हे कोणता फंडा वापरतील, हेदेखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

CTET 2021: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर; पाहा निकाल