
पुणे : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान कर्वे रस्त्यावरील पार्किंगमधील वाहने पोलिसांनी काढण्यास नागरिकांना भाग पाडल्याच्या प्रकाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निषेध केला आहे. तसेच व्हिआयपींचा दौरा, या नावाखाली सर्वसामान्यांना वेठिस धरू नये, अशी मागणी केली आहे.