
कर्नाटक राज्यातील धारवाड येथे २४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या एका कार्यक्रमात विराजला पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
विराज जोशीला संगीत क्षेत्रातील कर्नाटक सरकारचा ‘युवाप्रशस्ती पुरस्कार’ जाहीर
पुणे - संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी कर्नाटक सरकारतर्फे दिला जाणारा ‘युवाप्रशस्ती राष्ट्रीय पुरस्कार’ यंदा पं. भीमसेन जोशी यांचा नातू आणि पं. श्रीनिवास जोशी यांचा पुत्र व शिष्य गायक विराज जोशी याला जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे विराज हा पुरस्कार मिळविणारा सर्वात कमी वयाचा मानकरी ठरला आहे.
कर्नाटक राज्यातील धारवाड येथे २४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या एका कार्यक्रमात विराजला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. किराणा घराण्याचे गायक पं. बसवराज राजगुरू यांच्या नावाने संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख कलाकारांना कर्नाटक सरकारतर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. रोख रक्कम पंचवीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
विराजने आतापर्यंत भारतात विविध ठिकाणी सुमारे शंभरहून अधिक कार्यक्रमांमध्ये आपले गायन सादर केले आहे. यामध्ये प्रतिष्ठित असा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, मुंबई येथील काला घोडा महोत्सव, भारत भवन, भोपाल यांचा समावेश आहे. त्याने परदेशात सुमारे पंचवीसहून अधिक कार्यक्रम केले आहे. मुंबई येथील षणन्मुखानंद सभा यांच्यातर्फे दिली जाणारी संगीत क्षेत्रातील मानाची अशी डॉ. एम. एस. सुब्बलक्ष्मी विद्यावृत्ती त्याला मिळाली आहे. तो सध्या एमआयटी विश्वशांती विद्यापीठात बी ए लिबरल आर्ट्सच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे.
‘पं. बसवराज राजगुरू यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. यासाठी मी कर्नाटक सरकारचे आभार मानतो. अशा पुरस्कारामुळे संगीत क्षेत्रात आणखी काम करण्याची ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळते.’
- विराज जोशी
Web Title: Viraj Joshi Music Field Karnataka Government Yuvaprashasti National Award Declare
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..