पुणे - नवी पेठेतील वैंकूठ स्मशानभूमीत भटक्या कुत्र्याने अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे तुकडे खात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावरून एकच खळबळ उडाल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्मशानभूमीत जाऊन याची खातरजमा केली. यावेळी हे मांसाचे तुकडे नसून, पाव असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. पण वैकुंठ स्मशानभूमीत मृतदेह पूर्ण जळेपर्यंत ठेकेदाराचे कर्मचारी थांबत नसल्याने तेथे कुत्र्यांचा वावर वाढला आहे हा प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे.