
पुण्यात कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर तिच्याच सहकाऱ्याने कोयत्यानं वार करून तिची हत्या केली. या प्रकरणी आरोपी तरुणाला न्यायालयाने १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तरुणीने वडिलांच्या उपचाराचे खोटे कारण सांगून वेळोवेळी पैसे घेतले. जवळपास चार लाख रुपये घेतले आणि ते परत देण्यास टाळाटाळ करत होती. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने तिची हत्या केल्याचं समोर आलंय.