

Viral Video Shows Swift Pune Police Action, Sparks Fresh Debate on Women’s Safety
esakal
Viral Video: शहरातील पोलिस दल नेहमीच नागरिकांच्या सुरक्षेसाठी सक्रिय राहते. वाहतुकीचे नियंत्रण, कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घेणे किंवा आपत्कालीन परिस्थिती हाताळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते सातत्याने पार पाडतात. या प्रयत्नांमुळे शहरात शिस्त आणि सुरक्षिततेची जाणीव कायम राहते. मात्र, अनेकदा त्यांच्या या कार्याकडे दुर्लक्ष होते. अलीकडेच एका व्हिडिओने सोशल मीडियावर चर्चा निर्माण केली आहे, ज्यात पोलिसांच्या त्वरीत प्रतिसादाचे दर्शन घडते.