Vishal Agarwal : विशाल अग्रवाल यांची न्यायालयीन कोठडी रद्द करत पोलिस कोठीडीत रवानगी

या आदेशाचा पुनर्विचार करण्याची याचिका पोलिस आणि सरकारी वकील यांनी सत्र न्यायालयात करण्यात आली होती
Pune News
Vishal AgarwalESakal
Updated on

पुणे : ‘अंडरवर्ल्ड’सोबत संबंध असल्याचे सांगत जमीन व्यवहार प्रकरणात एका रिअल इस्टेट एजंटला जीवे मारण्याची धमकी देऊन एक कोटी ३२ लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना गुरुवारपर्यत (ता.४ ) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Pune News
Japan New Note: 20 वर्षांनंतर जपानने घेतला मोठा निर्णय; देशाची सर्वत्र होतेय चर्चा

या गुन्ह्यात अग्रवाल यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश लष्कर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिला होता. या आदेशाचा पुनर्विचार करण्याची याचिका पोलिस आणि सरकारी वकील यांनी सत्र न्यायालयात करण्यात आली होती. त्यावर झालेल्या युक्तिवादानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नरावडे यांनी न्यायालयीन कोठडीचा आदेश रद्द करत अग्रवाल यांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.

Pune News
Nandurbar Agriculture News: स्ट्रॉबेरी, सफरचंदापाठोपाठ सातपुड्यात ड्रॅगन फ्रुटची शेती; कोरडवाहू जमिनीत यशस्वी प्रयोग

कल्याणीनगर ‘पोर्श’ कार अपघात प्रकरणानंतर बांधकाम व्यावसायिक सुरेंद्रकुमार ब्रह्मादत्त अगरवाल (वय ७७) आणि विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल (वय ५०) या बापलेकासह त्यांचा साथीदार जसप्रीतसिंग राजपाल यांच्याविरोधात फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत मुश्ताक शब्बीर मोमीन (वय ४५, रा. कौसरबाग कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणात सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना नुकताच जामीन झाला आहे. मात्र, विशाल अगरवालला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. त्याविरोधात तपास अधिकाऱ्यांच्या वतीने सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी सत्र न्यायालयात फौजदारी ‘रिव्हिजन’ अर्ज केला. विशाल अग्रवाल यांच्याकडे गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे आणि फोनवरील संभाषण व व्हॉट्सअपवरील मेसेजबाबत तपास करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली. तो युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीची रवानगी पोलिस कोठडीत केली.

दरम्यान, बावधनमधील एका सोसायटीतील ७२ सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणात विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अग्रवाल यांच्यासह त्यांच्या अन्य साथीदारांविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अग्रवाल यांना पाच जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र आता त्यांना हिंजवडीतील गुन्ह्यातून कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात वर्ग केले जाणार आहे.

Related Stories

No stories found.