

पुणे - ‘राजधानीचे शहर नसूनदेखील पुण्याने गेल्या दहा वर्षांत देशाच्या अर्थकारणात अभूतपूर्व योगदान दिले आहे. महाराष्ट्र हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’, तर पुणे हे महाराष्ट्राचे ‘ग्रोथ इंजिन’ बनले आहे. आपल्या पुण्याला देशातील सर्वोत्तम ‘नॉन-कॅपिटल सिटी’ बनवण्याचे स्वप्न भाजप पूर्ण करू दाखवेल,’ असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.