

Pune News
sakal
नवले पुलावरील भीषण अपघातानंतर सर्वच सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली असून, विविध उपयोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुलाजवळ दोनशे मीटरच्या बाह्यसेवा रस्त्यासाठी ५४ गुंठे जागेच्या भूसंपादनाचा पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पाठविलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सोमवारी (ता. १७) मान्यता दिली. त्यामुळे लवकरच जागामालकांना मोबदला देऊन सेवा रस्त्याचे काम करण्यात येणार आहे.