Manchar News : आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राचा आवाज! मंचरचे जैव ऊर्जा तज्ञ ॲड. राहुल पडवळ यांचा नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गौरव

बायोगॅस प्रकल्प हे केवळ हरित ऊर्जा निर्मितीचे साधन नसून, त्यातून शाश्वत शेतीसाठी लागणारे दर्जेदार सेंद्रिय खत निर्मितीचा मोठा स्रोत आहे.
Advocate Rahul Padwal

Advocate Rahul Padwal

sakal

Updated on: 

मंचर - बायोगॅस प्रकल्प हे केवळ हरित ऊर्जा निर्मितीचे साधन नसून, त्यातून शाश्वत शेतीसाठी लागणारे दर्जेदार सेंद्रिय खत निर्मितीचा मोठा स्रोत आहे, अशी प्रभावी भूमिका मंचर (ता. आंबेगाव) येथील जैव ऊर्जा तज्ज्ञ ॲड. राहुल पडवळ यांनी नवी दिल्ली येथे मांडली.

इंडिया एक्स्पो मार्ट, ग्रेटर नोएडा येथे इंडियन बायोगॅस असोसिएशनच्या वतीने आयोजित 'इंटरनॅशनल बायो-एनर्जी कॉन्फरन्स २०२६' मध्ये 'बियाँड बायोगॅस : द नेक्स्ट जनरेशन रिन्यूएबल फ्युएल' या विषयावरील विशेष चर्चासत्रात ॲड. पडवळ यांनी मार्गदर्शन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com