
पुणे - पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यासाठी दोन महापालिका उपायुक्तांवर जबाबादारी निश्चित करण्यात आली आहे. प्रभागनिहाय मतदार यादी फोडणे, ती अंतिम करून सही शिक्क्यासह निवडणूक शाखेकडे सादर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. उपायुक्त रवी पवार आणि निखिल मोरे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.