प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्टला प्रसिद्ध होणार

प्रारूप मतदार यादी 
३१ ऑगस्टला प्रसिद्ध होणार
Published on

पुणे, ता. २४ : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे, तर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत प्राप्त झालेल्या दावे व हरकतींवर २९ ऑक्टोबरपर्यंत सुनावण्या घेण्यात येणार आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली.

प्राप्त झालेल्या दावे व हरकतींवर सुनावण्या घेण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सुनावण्याबाबत नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. मतदारांना सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी तीन संधी दिल्या जातील. तीनदा नोटीस देऊनही मतदार सुनावणीसाठी उपस्थित न राहिल्यास त्याचे नाव यादीतून वगळण्याची पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.

Marathi News Esakal
www.esakal.com